उद्योग

सांगा पाहू!

views

5:43
उद्योगांमुळे होणारे फायदे: रोजगार, शेतीचा विकास, लोकसंख्या, वस्तूंच्या स्थिर किंमती, कुशल मनुष्यबळ, राहणीमान उंचावणे, मजूर पुरवठा, बाजारपेठ, जास्त जमीन ओलिताखाली, वाहतूक सोयींचा विकास, दळणवळण, सांस्कृतिक विकास, साक्षरता, नागरीकरणाला चालना, मुबलक पाणी, अखंडित विद्युत पुरवठा हे उद्योगांच्यामुळे होणारे फायदे आहेत. उद्योगांमुळे होणारे तोटे: वनप्रदेशांचा ऱ्हास, प्रदूषण, जमिनीच्या वाढत्या किमती, झोपडपट्टी, दारिद्रय, स्थलांतरितांची संख्या हे उद्योगांमुळे होणारे तोटे आहेत. या वर्गीकरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की उद्यीगांचे काही फायदे आहेत. तशाच त्यामुळे निर्माण होणाऱ्या काही समस्या सुद्धा आहेत. उद्योगांची वाढ होणाऱ्या प्रदेशात पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होतो. हवा, जल, मृदा यांसारख्या प्रदूषणाच्या समस्या निर्माण होतात. भौगोलिक स्पष्टीकरण: औद्योगिकरणामुळे किंवा औद्योगिक विकास झाल्यामुळे अनेक फायदे होतात. उदा: वाहतूक सोयींचा विकास, राहणीमान उंचावणे, रोजगाराची निर्मिती यांसारखे अनेक फायदे होतात. उद्योगांची वाढ ज्या प्रदेशात होते, त्या प्रदेशातील युवकांना रोजगार मिळतो. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. आपल्या भारतासारख्या कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते.