उद्योग

पहा बरे जमते का?

views

3:38
लोह-पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी म्हणजे उद्योग स्थापन होण्यासाठी आवश्यक कच्चा माल, ऊर्जासाधने हे प्रमुख घटक जमशेदपूरच्या जवळच्या प्रदेशांत उपलब्ध होतात. लोह्पोलाद उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल वजनाने जड असतो. असा हा जड माल लांब अंतरावरील उद्योगांपर्यंत वाहून नेणे फायद्याचे नसते. त्यामुळे लोह पोलाद हा उद्योग कच्चा माल असलेल्या प्रदेशातच स्थापन करणे फायद्याचे होते. त्यामुळे जमशेदपूर येथे लोह-पोलाद उद्योग मोठ्या प्रमाणात आढळतो. उद्योगांचे स्वरूपावरून लघु, मध्यम व अवजड किंवा मोठे उद्योग असे तीन प्रकार पडतात. लघुउद्योगातील उद्योगांचे स्वरूप अगदी लहान किंवा कमी मनुष्यबळ असलेले असते. तर मध्यम उद्योगात अगदी कमीही नाही व जास्तही नाही असे मध्यम स्वरूपाचे मनुष्यबळ व भांडवल लागते. तर अवजड किंवा मोठ्या उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडवल, मनुष्यबळ व कच्चा माल यांची गरज असते.