उद्योग

उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक

views

4:42
एखादा उद्योग एखाद्या विशिष्ट प्रदेशात सुरु होण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. ते घटक कोणते याची माहिती आपण घेऊ. आपण पाहिले, की वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल आवश्यक असतो. तसेच इतरही वेगवेगळे घटकही उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करीत असतात. एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यावर अनेक घटक परिणाम करीत असतात. उदा: कच्चा माल, मनुष्यबळ, पाणीपुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठा इ. घटक उपलब्ध असतील तर अशा प्रदेशांत उद्योगांची वाढ होते. . उदा: सपाट मैदानी प्रदेश, नदी खोऱ्यातील प्रदेश हे प्रदेश शेती व्यवसायासाठी अनुकूल असतात. त्यामुळे अशा प्रदेशांत शेतीवर आधारित उद्योगांची वाढ होते. तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात. उदा: लोहपोलादाच्या खाणी ज्याठिकाणी असतात, त्याठिकाणी लोहपोलाद उद्योगच चालतो. तर काश्मीर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी लोकरीपासून वस्त्र बनविण्याचे उद्योग चालतात. परंतु मुलांनो, असेही काही प्रदेश असतात ज्याठिकाणी कोणत्याच प्रकारचे उद्योग केले जाऊ शकत नाही. उदा: घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात.