उद्योग

जरा डोके चालवा

views

4:06
ते उद्योग कोणते आहेत ते आपण पाहू, चित्र-1): माहिती तंत्रज्ञान उद्योग चित्र-2): मासे प्रक्रिया उद्योग दूध व दुग्धजन्यपदार्थ निर्मिती उद्योग. या उद्योगांची नावे ऐकल्यानंतर तुम्हांला त्यांच्या कामाचे स्वरूप लक्षात आले असेल. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील 60% ते 70% लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्या देशात कृषीवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती सर्वत्र सारखीच आहे असे नाही. हवामान, पाणी, मृदा, नैसर्गिक वनस्पती यांच्या कमी –अधिक उपलब्धतेमुळे उद्योगही वेगवेगळे आढळतात. कृषीवर आधारित उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या विविध वस्तूंवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचाही विकास झाला आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय, फळप्रक्रिया, अन्नप्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादींचा समावेश होतो. कृषीवर आधारित या प्रकारचे लघु, मध्यम उद्योग सर्वत्र स्थापन झाले आहेत. तसेच मोठे किंवा अवजड उद्योगही विकसित झाले आहेत. उदा:वस्त्रोद्योग, साखर उद्योग इत्यादी.