उद्योग

औद्योगीकरण व पर्यावरण

views

3:11
आपल्याला माहीत आहे की उद्योगांमध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो. असा माल तयार होत असताना किंवा त्यांच्यावर प्रक्रिया करीत असताना त्यातील काही भाग किंवा काही पदार्थ कारखान्यातून बाहेर फेकले जातात. उदा: सांडपाणी, धूर, धूळ व काही नको असलेले पदार्थ कारखाना व त्याच्या आसपासच्या प्रदेशात टाकले जातात. त्यामुळे हवा, पाणी, ध्वनी व जमीन यांचे प्रदूषण होते. हे सर्व प्रकारचे प्रदूषण उद्योगांमुळे म्हणजेच औद्योगीकरणामुळे होत असल्याने अशा प्रदूषणाला ‘औद्योगिक प्रदूषण’ असे म्हणतात. औद्योगिक प्रदूषण हे फक्त आपल्या देशातच होते किंवा ही समस्या फक्त भारतातच आहे असे नव्हे, तर ती समस्या संपूर्ण जगाची आहे. एखाद्या देशाचा औद्योगिक विकास जेवढा जास्त तेवढी औद्योगिक प्रदूषणाची समस्या मोठी असते. त्यामुळे आजच्या काळात कोणत्याही एका/दुसऱ्या देशाने याचा विचार न करता संपूर्ण जगाने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आणि तसा विचार आज केला जात आहे. कोणत्याही उद्योगाचे स्थानिकीकरण करत असताना परंपरागत घटकांचा विचार केला जात आहेच. उदा: कच्चा माल, बाजारपेठ, पाणी पुरवठा या घटकांबरोबरच पारिस्थितीकीय घटकांचाही विचार केला जात आहे. म्हणजेच, पर्यावरणीय घटकांचाही विचार केला जात आहे. जास्त मानवी वस्ती असलेल्या प्रदेशात उद्योगधंदे स्थापन केले जात नाहीत.