सांख्यिकी

प्रस्तावना

views

04:40
या पाठात आपण विविध आलेख, तसेच वारंवारता सारणी, शतमान अशा माहितींच्या जोड स्तंभालेखांचा अभ्यास करणार आहोत. मागील इयत्तेत स्तंभालेख व जोडस्तंभालेखाचा अभ्यास केला आहे. आलेखाचे वाचन, निरीक्षण कसे करायचे याचा सुद्धा अभ्यास केला आहे. त्याची उजळणी म्हणून आता आपण काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण: एका शेतकऱ्याला त्याच्या शेतातून गहू व ज्वारी या दोन पिकांचे तीन वर्षात मिळालेले उत्पादन दर्शवणारा हा जोडस्तंभालेख काढून दाखवला आहे. त्यावरून मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तीन वर्षांमध्ये कोणत्या धान्याचे उत्पादन सतत वाढले आहे? आलेखाचे निरीक्षण केले असता असे दिसते की गव्हाचे उत्पादन सतत वाढले आहे. 2012 मध्ये 2011 पेक्षा ज्वारीचे उत्पादन किती कमी झाले? 2011 मध्ये ज्वारीचे उत्पादन 15 क्विंटल होते. 2012 मध्ये ते 12 क्विंटल झाले. म्हणून ते 3 क्विंटल ने कमी झाले. 2010 मधील गव्हाचे उत्पादन व 2012 मधील गव्हाचे उत्पादन यातील फरक किती? 2010 मध्ये गव्हाचे उत्पादन 30 क्विंटल होते. 2012 मध्ये 48 क्विंटल झाले. दोन्ही वर्षात मिळून 18 क्विंटलचा फरक आहे. आता आपण विभाजित स्तंभालेख कसा काढतात याची माहिती घेऊ. सामग्रीतील माहितीची तुलना दर्शवणारा स्तंभालेख वेगळ्या पद्धतीनेही काढता येतो. त्याला विभाजित स्तंभालेख म्हणतात. विभाजित स्तंभालेख काढण्यासाठी दिलेल्या माहितीतील एकाच प्रकारच्या दोन बाबींच्या बेरजा करतात. आलेल्या बेरजा योग्य प्रमाण घेऊन स्तंभांनी दर्शवतात. स्तंभाचे प्रत्येक बाब दर्शवणारे प्रमाणबद्ध भाग करतात. दिलेल्या माहितीची एकूण बेरीज करून स्तंभालेख काढायचा व नंतर दिलेली माहिती विभाजित करून ठेवायची.