सांख्यिकी

सामग्रीचे वर्गीकरण

views

03:53
सांख्यिकीमध्ये वर्गीकरण कसे करतात हे आपण यापूर्वीही शिकलो आहोत. त्याचीच उजळणी म्हणून मी तुम्हांला एक उदाहरण सांगते. त्यातील प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्या. एका शाळेतील इयत्ता 9 वी च्या 50 विद्यार्थ्यांनी प्रथम घटक चाचणीत गणितात 20 पैकी मिळवलेले गुण खालील प्रमाणे आहे. 20,6,14,10,13,15,12,14,17,17,18,11,19,9,16,18,14,7,17,20,8,15,16,10,12,18,17,12, 11,11,10,16,14,16,18,10,7,17,14,20,17,13,15,18,20,12,12,15,10 येथे संकलित केलेल्या संख्यात्मक माहितीस काय म्हणतात? कच्ची सामग्री. यातील प्रत्येक संख्येस काय म्हणतात? उत्तर - प्राप्तांक. 15 गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी किती? उत्तर - 5 15 गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी किती? उत्तर - 20 16 गुणांपेक्षा कमी गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी किती? उत्तर - 28 सर्वात कमी गुण किती आहेत? उत्तर - 6 सर्वात जास्त गुण किती आहेत? उत्तर - 20