सांख्यिकी

केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे

views

03:17
सर्वेक्षणाने मिळवलेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये सामान्यपणे एक गुणधर्म आढळतो. सामग्रीतील एखाद्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी अधिक झालेली दिसते. समूहाच्या या गुणधर्माला समूहाची केंद्रीय प्रवृत्ती म्हणतात. समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची अधिक गर्दी असते, ती संख्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करते असे मानतात. अशा संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण म्हणतात. 1) मध्य (Mean): सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असे म्हणतात. मध्य काढण्यासाठी दिलेल्या प्राप्ताकांची बेरीज करून त्याला प्राप्ताकांच्या एकूण संख्येने भागतात. त्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे. सामग्रीचा ‘मध्य’ = (सामग्रीतील सर्व प्राप्तांकाची बेरीज )/(सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या) आता हे सूत्र आपण खालील उदाहरणांद्वारे समजून घेऊ. उदा1) 25,30,27,23 आणि 25 या प्राप्तांकाचा मध्य काढा. उकल: मध्य =(25+30+27+23+25 )/5 = 130/5 = 26. ∴ या प्राप्तांकाचा मध्य 26 आहे.