सांख्यिकी

शतमान स्तंभालेख

views

05:46
दिलेल्या माहितीची तुलना वेगळ्या प्रकारे समजण्यासाठी दिलेली माहिती शतमानांत रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात, त्याला शतमान स्तंभालेख म्हणतात. यात प्रत्येक वर्षात ज्वारी व गव्हाचे उत्पादन क्विंटलमध्ये दिले आहे. त्याचा तक्ता खालीलप्रमाणे आहे. 2010 साली गव्हाचे उत्पादन 30 क्विंटल व ज्वारीचे उत्पादन 10 क्विंटल आहे. दोन्ही धान्यांचे मिळून 40 क्विंटल उत्पादन आहे. त्यांचे शतमान काढले असता एकूण उत्पादनाच्या प्रमाणात गव्हाच्या उत्पादनाचे शतमान 2010 साली 75% मिळाले. 2011 ते 70% झाले. तर 2012 साली ते 80% झाले. आतापर्यंत आपण शतमान स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेखांचा अभ्यास केला. आता मी तुम्हांला काही उदाहरणे सांगते. त्यासाठी कोणता स्तंभालेख काढणे योग्य असेल ते तुम्ही सांगा. चार गावांतील साक्षरांचे शेकडा प्रमाण. शतमान स्तंभालेख एका कुटुंबाचा विविध घटकांवर होणारा खर्च. विभाजित शतमान स्तंभालेख. पाच तुकड्यांपैकी प्रत्येक तुकडीतील मुले व मुलींची संख्या. विभाजित स्तंभालेख 3 दिवस चालणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाला रोज भेट देणाऱ्या व्यक्तींची संख्या साधा स्तंभालेख जानेवारी ते जून या प्रत्येक महिन्याचे तुमच्या गावातील कमाल व किमान तापमान. जोडस्तंभालेख किंवा विभाजित स्तंभालेख. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणाऱ्या व न वापरणाऱ्या 100 कुटुंबातील व्यक्तींची संख्या. जोडस्तंभालेख किंवा विभाजित स्तंभालेख किंवा शतमान स्तंभालेख. यावरून समजते की तुम्हांला दोन्ही स्तंभालेख छान समजलेत.