सांख्यिकी

मध्यक

views

03:23
दिलेल्या सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडतात. या मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला त्या सामग्रीचा मध्यक म्हणतात. सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या सम असेल तर मध्यावर येणाऱ्या दोन संख्यांची सरासरी हा मध्यक मानतात. मध्यक कसा काढतात ते आपण पुढील उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊ. उदा1) 72, 66, 87, 92, 63, 78, 54 या सामग्रीचा मध्यक काढा. उकल: मुलांनो, प्रथम दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडा. 54, 63, 66, 72, 78, 87, 92. येथे एकूण 7 संख्या आहेत. म्हणजे उजवीकडे 3 संख्या सोडून 72 ही संख्या मध्यावर येते. म्हणजेच या मांडणीत चौथी संख्या मध्यावर येते व ती 72 आहे. म्हणून दिलेल्या सामग्रीचा मध्यक 72 आहे. उदा2) 30, 25, 32, 23, 42, 36, 40, 33, 21, 43 या सामग्रीचा मध्यक काढा. उकल: प्रथम दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडा. 21, 23, 25, 30, 32, 33, 36, 40, 42, 43. येथे प्राप्तांकांची संख्या 10 म्हणजे सम आहे. आणि आपल्याला माहित आहे की सम संख्या असेल तर मध्यावर येणाऱ्या दोन संख्यांची सरासरी हा मध्यक मानतात. वरील उदाहरणात पाचवी संख्या व सहावी संख्या अशा दोन संख्या मध्यावर येतात म्हणून त्यांची सरासरी काढू. (32+33)/2 = 65/2 = 32.5 म्हणून सामग्रीचा मध्यक 32.5 आहे.