सांख्यिकी

वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणी

views

03:25
एखाद्या विशिष्ट वर्गाची वारंवारता आणि त्या वर्गाच्या आधीच्या सर्व वर्गांच्या वारंवारता यांच्या बेरजेला त्या वर्गाची वरच्या मर्यादेपेक्षा कमी प्रकारची (Less than cumulative frequency) संचित वारंवारता म्हणतात. थोडक्यात हिला ‘पेक्षा कमी संचित वारंवारता’ सुद्धा म्हणतात. ही सारणी समजण्यासाठी खालील उदाहरण समजून घेऊ. उदाहरण: इयत्ता 9 वी च्या एका शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी प्रथम घटक चाचणीत गणितात 40 पैकी मिळवलेल्या गुणांची वारंवारता वितरण सारणी पुढे दिली आहे 10 ते 20 या वर्गाची खालची वर्गमर्यादा व वरची वर्गमर्यादा किती आहे? खालची वर्गमर्यादा 10 आणि वरची वर्गमर्यादा 20 आहे. 10 पेक्षा कमी गुण मिळणारे विद्यार्थी किती आहेत? 2 20 पेक्षा कमी गुण मिळणारे विद्यार्थी किती? येथे 20 पेक्षा कमी गुण मिळणारे विद्यार्थी विचारले आहे म्हणून 0 ते 10 पर्यंतचे दोन विद्यार्थी व 10 – 20 गुणांमधील 12 विद्यार्थी 2 + 12 = 14 असे एकूण 14 विद्यार्थी आहेत. 30 पेक्षा कमी गुण मिळणारे विद्यार्थी किती आहेत? 2+12+20 = 34 विद्यार्थी आहेत. 40 पेक्षा कमी गुण मिळणारे विद्यार्थी किती आहेत? 2+12+20+16=50. विद्यार्थी आहेत. बरोबर उत्तरे दिलीत तुम्ही.