सांख्यिकी

सांख्यिकीमधील काही संज्ञा

views

03:40
सांख्यिकीमधील काही संज्ञा. (1) वर्ग (Class): प्राप्तांकाच्या सोईस्कर आकाराच्या गटांना वर्ग असे म्हणतात. 6ते10, 11ते15. हे वर्ग 6-10, 11-15 असेही लिहितात. (2) वर्गमर्यादा (Class limits): वर्ग दर्शवणाऱ्या संख्यांना वर्गमर्यादा म्हणतात. 6 ते 10 या वर्गाची 6 ही खालची वर्गमर्यादा व 10 ही वरची वर्गमर्यादा आहे. (3) वारंवारता (Frequency): प्रत्येक वर्गात जेवढे प्राप्तांक येतात, त्या प्राप्तांकांच्या एकूण संख्येस त्या वर्गाची वारंवारता म्हणतात. वरील सारणीत 11 ते 15 या वर्गात 20 प्राप्तांक येतात. म्हणून 11 ते 15 या वर्गाची वारंवारता 20 आहे असे म्हणतात. (4) वर्गांतर किंवा वर्गअवकाश (Class Width): अखंडित वर्ग दिले असताना लगत येणाऱ्या दोन वर्गांच्या खालच्या किंवा वरच्या मर्यादांतील फरकाला वर्गांतर असे म्हणतात. उदा: 5–10, 10-15, 15-20 असे वर्ग असल्यास 5-10 चे वर्गांतर 10-5=5 आहे. वरची वर्गमर्यादा – खालची वर्गमर्यादा =वर्गांतर किंवा वर्गअवकाश उदा. 10 – 5 = 5 6, 10, 10.3, 11, 15.7, 19, 20, 12, 13 हे प्राप्तांक दिले आहेत. तर आता आपण 6-10, 11-15, 16-20 असे वर्ग घेऊन याची वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करू.