सामाजिक आरोग्य

प्रस्तावना, सामाजिक आरोग्य

views

04:38
मुलांनो, तुम्हांला तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी नेहमी मैदानी खेळ खेळण्यास सांगत असतील. कारण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन यांच्या अतिवापरामुळे शरीराला व्यायाम होत नाही. शिवाय समाजातील लोकांशी संपर्कही तुटतो. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यही बिघडते. तसेच आजच्या धकाधकीच्या युगात दैनंदिन कामकाजाच्या गडबडीत आपण समाजापासून दुरावत चाललो आहोत. आज आपण समाजातील या विविध बाबींविषयीची माहिती या पाठात अभ्यासणार आहोत.