सामाजिक आरोग्य

ताणतणाव व्यवस्थापन

views

05:54
आजच्या या धकाधकीच्या काळात ताणतणावाचे योग्य ते व्यवस्थापन केले पाहिजे. हे चित्र पहा यात दाखविल्याप्रमाणे सार्वजनिक उद्यानामध्ये सकाळी एकत्र जमून मोठ-मोठ्याने हसणारे लोक तुम्ही पाहिले असतील. हे लोक मोठ-मोठ्याने हसतात व आपला ताणतणाव दूर करतात. या मनमोकळेपणाने हसणाच्या संकल्पनेला ‘हास्य मंडळ’ असे म्हणतात. मित्र-मैत्रिणी, भाऊ- बहीण, पालक, समवयस्क व्यक्ती यांच्या बरोबर संवाद साधल्यामुळे मन मोकळे होते. तसेच मनातले विचार लिहून काढल्याने, हसण्याने ताणतणाव कमी होत असतो.