सामाजिक आरोग्य

सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक

views

05:16
आज तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत. लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. आता विभक्त कुटुंब पद्धतीचा लोक मोठ्या प्रमाणात स्वीकार करत आहेत. त्यामुळे घरखर्च वाढल्याने आई-वडील दोघांनाही नोकरी किंवा व्यवसायामुळे घराबाहेर राहावे लागते. अशा परिस्थितीत मूल स्वत:ला एकाकी समजू लागते व त्याचा मानसिक ताणताणाव वाढू लागतो. आजच्या आधुनिकतेच्या काळातही काही कुटुंबात मुलां-मुलींमध्ये भेदभाव केला जातो. मुलांना स्वातंत्र्य दिले जाते, तर मुलींवर अनेक प्रकारची बंधने घातली जातात.