सामाजिक आरोग्य

थोडे आठवा

views

04:14
कार्टून मालिका पाहण्यामुळे लहान-मुलांवर त्याचा खूप जास्त प्रभाव पडतो. शिवाय काही आयोग्य संदेशही मुलांपर्यंत पोहचले जातात. त्यामुळे अशा काही कार्टून मालिकेवर शासनाने बंदी घातली आहे. यात दाखवल्याप्रमाणे तुमच्या घरातही लहान मुलांना तुम्ही असे मोबाईल पाहत, टीव्ही पाहत जेवताना पाहिले असेल. या प्रसार माध्यमांचा मुलांवर इतका प्रभाव पडत आहे की, कार्टून फिल्मस् पाहणारी मुले त्या फिल्ममधील पात्रांसारखी वागू लागतात. शिंच्यान, छोटा भीम, नोबिता ही मुलांची आवडती पात्र. त्यांची नक्कल करण्याचा मुले प्रयत्न करतात. बऱ्याच गेम्समध्ये गाड्यांच्या शर्यती, अपघात असतात, किंवा युद्धेही असतात. हे गेम्स खेळल्यामुळे मुलांमध्ये नकारात्मकता येते. त्यांचा स्वभावही चिडखोर, रागीट होतो. मोबाईल किंवा संगणकावर असणाऱ्या गेम्समुळे मुलांचा वेळ वाया जातो.