पूर्णांक संख्या

पूर्णांक संख्यांची बेरीज

views

8:08
पूर्णांक संख्यांची बेरीज. आता आपण पूर्णांक संख्यांची बेरीज संख्यारेषेच्या साहाय्याने कशी करतात ते पाहू. एखाद्या संख्येत धन संख्या मिळवणे. प्रथम एक रेषा काढू. रेषेवर समान अंतरावर खुणा करू. त्यांना एकक म्हणतात. एका बिंदुला ‘0’ शून्य ही संख्या दाखवू. ह्या बिंदूला आरंभबिंदू म्हणतात. ह्या बिंदूच्या उजवीकडे समान अंतरावर असणाऱ्या बिंदुना अनुक्रमे 1,2,3,......... असे लिहू. आरंभबिंदूच्या (0च्या) डावीकडे समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंवर -1,-2,-3,...... असे लिहू. ही झाली आपली संख्यारेषा. आता एक नियम लक्षात ठेवा. •एखाद्या संख्येत धन संख्या मिळवायची असेल तर त्या संख्येच्या उजवीकडे धन संख्ये इतके एकक पुढे जा. •उदा 1) : 3 + 2 = 3 + (+2) = 5 प्रथम संख्यारेषेवरील 3 हा एकक शोधा. 3 पासून 2 एकक उजवीकडे जा. किती येतात ? तर 5. म्हणून 3 + 2 = 5 उदा. २) -5 + 7 =? संख्यारेषेवरील -5 हा एकक शोधा. -5 पासून 7 एकक उजवीकडे जा. किती येतात ? तर 2 म्हणून -5 + 7 = 2