पूर्णांक संख्या

उदाहरणांच्या मदतीने नियम समजून घेऊ

views

2:12
आता आपण काही उदाहरणांच्या मदतीने पूर्णांक संख्या चिन्हांचे नियम समजून घेऊ. प्रथम समान चिन्ह पूर्णांकांची बेरीज करू. आता भिन्न चिन्ह पूर्णांकांची बेरीज करू. 3 + (2) = 5 -5 + 7 = +2 1+ (5) = 6 -3 + 6 = +3 -3 + (-4) = -7 -5 +3 = -2 -4 + (-2) = -6 -3 +4 = +1 या सर्व बेरजांचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की . 1) डावीकडील बेरजा ह्या समान चिन्ह असलेल्या पूर्णांकांच्या आहेत. त्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता बेरीज केली आहे. आणि येणाऱ्या बेरजेला म्हणजेच उत्तराला दोघांचे समान चिन्ह दिले आहे. जसे -3 + (-4) = -7. यामध्ये दोघांचेही चिन्ह – (ऋण) आहे. म्हणून मिळालेली बेरीजही ऋण आहे. 2) उजवीकडील बेरजा ह्या भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांकांच्या आहेत. त्यांची बेरीज करताना चिन्हांचा विचार न करता – मोठया संख्येतून लहान संख्या वजा केली आहे. आणि आलेल्या वजाबाकीला मोठया संख्येचे चिन्ह दिले आहे. जसे +3 -5 = -2. यामध्ये दोघांचे चिन्ह भिन्न आहे. म्हणून मिळणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह दिले आहे.