पूर्णांक संख्या

विरुद्ध संख्या व त्यांचे गुणधर्म

views

3:15
. विरुद्ध संख्या व त्यांचे गुणधर्म आता आपण विरुद्ध संख्या म्हणजे काय ते समजून घेऊ. समजा संख्या रेषेवर ‘0’ वर दोन ससे आहेत. दोघांनी 3 एकक एकमेकांच्या विरुद्ध दिशेला उडी मारली तर ते कोणत्या संख्यांवर येतील ? तर ते +3 आणि -3 या संख्यांवर येतील. त्याचप्रमाणे, जर त्यांनी 5 एकक ‘0’ च्या विरुद्ध दिशेला उडी मारली तर ते + 5 आणि -5 या संख्यांवर येतील. याप्रमाणे +3, -3 किंवा +5, -5 अशा संख्यांच्या जोडीला विरुद्ध संख्या म्हणतात. यावरून, असे म्हणता येईल की शून्यापासून समान अंतरावर पण विरुद्ध दिशांना असणाऱ्या संख्यांना विरुद्ध संख्या म्हणतात. • आता समजा आपण संख्यारेषेवर i) ‘0’ पासून उजवीकडे 5 एकक गेलो तर + 5 मिळतील + 5पासून पुन्हा डावीकडे 5 एकक मागे आलो तर पुन्हा ‘0’ मिळेल. म्हणजे + 5 + (-5) = 0 ii) समजा शून्यापासून डावीकडे 3 एकक गेलो तर -3 मिळतील व -3 पासून पुन्हा उजवीकडे 3 एकक आलो तर ‘0’ मिळेल . म्हणजे (-3) + (+3) = 0 याप्रमाणे (-7) + (+7) = 0, 25 + (-25) = 0 यावरून आपल्याला असे समजते की दोन विरुद्ध संख्यांची बेरीज शून्य असते.