पूर्णांक संख्या

एखाद्या संख्येत ऋण संख्या मिळवणे

views

9:08
एखाद्या संख्येत ऋण संख्या मिळवणे.: एखाद्या संख्येत धन संख्या कशी मिळवायची ते तुम्हाला कळले आहे. पण आता एखाद्या संख्येत (धन/ॠण) ॠण संख्या मिळवायची तर ती कशी मिळवायची ते आपण पाहू. ऋण संख्या मिळवायची असेल तर त्या संख्येच्या डावीकडे तितके (ॠण संख्ये इतके) एकक जा. हे लक्षात ठेवा की, जर एखाद्या संख्येत (धन/ॠण) ॠण संख्या मिळवायची तर त्या संख्येच्या डावीकडे तितके (ॠण संख्ये इतके) एकक जावे लागते. उदा. 1) 3 + (-5) = ? प्रथम संख्यारेषेवरील 3 हा एकक शोधा. 3 पासून 5 एकक डावीकडे जा. किती येतात ? तर -2 म्हणून 3 + (-5) = -2 उदा.2) 4 + (-3) = ? प्रथम संख्यारेषेवरील 4 हा एकक शोधा. 4 पासून 3 एकक डावीकडे जा. किती येतात ? तर 1 म्हणून 4 + (-3) = 1 उदा 3) -3 + (-4) = ? प्रथम संख्यारेषेवरील -3 हा एकक शोधा. -3 पासून 4 एकक डावीकडे जा. किती येतात ? तर -7 म्हणून -3 + (-4) = -7 उदा 4) -4 + (-2) = ? प्रथम संख्यारेषेवरील -4 हा एकक शोधा. -4 पासून 2 एकक डावीकडे जा. किती येतात ? तर -6 म्हणून -4 + (-2) = -6