पूर्णांक संख्या

पूर्णांक संख्यांची वजाबाकी

views

1:35
पूर्णांक संख्यांची वजाबाकी मुलांनो तुम्हाला पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करतात ते माहीत आहे. समान चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करून, आलेल्या बेरजेला तेच, समान असलेले चिन्ह द्यायचे असते. उदा. : -2 -3 = -5 किंवा 4 + 6 = 10 आणि जर भिन्न चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज करायची असेल तर त्या संख्येतील मोठया संख्येतून लहान संख्या वजा करायची व आलेल्या वजाबाकीला मोठया संख्येचे चिन्ह द्यायचे. उदा. -6 + 4 = -2 किंवा 9 – 15 = -6 आता पूर्णांक संख्यांची वजाबाकी करताना, दिलेल्या वजाबाकीचे रूपांतर बेरजेत करायचे. म्हणजे नेमके काय करायचे ? ते पहा . यासाठी दिलेल्या संख्येतून जी संख्या वजा करायची, तिची ‘विरुद्ध संख्या’ दिलेल्या संख्येत मिळवायची व बेरजेच्या नियमानुसार बेरीज करायची. उदा 1). (-9) – (-4) या वजाबाकीत (-9) मधून (-4) ही संख्या वजा करायची आहे तर -9 मध्ये -4 ची विरुद्ध संख्या +4 मिळवायची म्हणजे i) (-9) – (-4) = -9 + (+4) = -9 + 4 = -5