पूर्णांक संख्या

पूर्णांक संख्यांचा लहानमोठेपणा

views

2:54
पूर्णांक संख्यांचा लहानमोठेपणा आपण पाहिले आहे की, संख्यारेषेवर, 4 पेक्षा >3 लहान, 3 पेक्षा >2 लहान, 2 पेक्षा >1 लहान आणि 1 पेक्षा >0 लहान असतो. तसेच 0 पेक्षा >-1 लहान, -1 पेक्षा >-2 लहान, -2 पेक्षा >-3 लहान आणि -3 पेक्षा > -4 लहान असतो. आणि पुढे या संख्या अशाच क्रमाने लहान किंवा मोठ्या होत जातात. यावरुन आपण पूर्णांक संख्यांच्या लहान – मोठेपणा बाबत काही गुणधर्म सांगू शकतो. 1)‘0’ ही संख्या कोणत्याही ॠण संख्येपेक्षा मोठी असते. तसेच ‘0’ ही संख्या कोणत्याही धन संख्येपेक्षा लहान असते. 2)कोणतीही धन संख्या, शून्य व ॠण संख्यांपेक्षा मोठी असते. 3)कोणतीही ॠण संख्या, शून्य व धन संख्यांपेक्षा लहान असते. 4)संख्यारेषेवर दिलेल्या संख्येच्या उजवीकडील संख्या मोठी तर डावीकडील संख्या लहान असते. या सर्व गुणधर्मावरून आपण धनसंख्या, शून्य व ऋण संख्या विचारात घेऊन त्यांच्यातील लहान-मोठेपणा ठरवू शकतो. याकरिता मी फळ्यावर काही संख्या लिहिते. आणि तुम्ही सांगा की यातील कोणती संख्या लहान व कोणती मोठी आहे.