सजीव सृष्टी

वाढ , वाढीसाठी अन्नाची आवश्यकता

views

4:47
सजीवांचे पहिले लक्षण आहे वाढ. सजीवांचा जन्म झाल्यानंतर त्यांची वाढ होताना दिसते. वाढ होताना शरीराचा आकार वाढतो, उंची वाढते. एवढेच नव्हे तर शरीराच्या अंतर्भागातही वाढ होत असते. वनस्पतींची उंचीही आपल्याला वाढताना दिसते. पण निर्जीवांमध्ये ही वाढ दिसून येत नाही. प्राण्यांच्या शरीराची वाढ ही एका ठराविक कालावधीपर्यंत होते तसं वनस्पतींच्या वाढीच्या बाबतीत नसतं. वनस्पतींची वाढ ही जिवंत असेपर्यंत होतच राहते.