सजीव सृष्टी

चेतनाक्षमता व हालचाल , प्रजनन किंवा पुनरुत्पादन

views

2:57
चेतानाक्षमता व हालचाल करणे हे सजीवांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. अन्न मिळवणे, स्वत:चे रक्षण करणे यासाठी सजीव स्वत:हून हालचाली करतात. यालाच स्वयंप्रेरणेने हालचाल करणे असे म्हणतात. जसे पक्षी उडतात, मासे पोहतात, माणसे चालतात, फुले उमलतात. सर्व सजीव स्वत:सारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही प्राणी पिलांना जन्म देतात. काही प्राणी अंडी घालतात. त्यातून त्यांची पिले बाहेर पडतात. काही वनस्पतींच्या बियांपासून, काही वनस्पतींच्या मुळे, फांद्यापासून नवीन वनस्पती तयार होतात. स्वत:सारखा दुसरा जीव निर्माण करणे याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात.