सजीव सृष्टी

प्रजनन किंवा पुनरुत्पादन

views

2:22
सर्व सजीव स्वत:सारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही प्राणी पिलांना जन्म देतात. काही प्राणी अंडी घालतात. त्यातून त्यांची पिले बाहेर पडतात. काही वनस्पतींच्या बियांपासून, काही वनस्पतींच्या मुळे, फांद्यापासून नवीन वनस्पती तयार होतात. स्वत:सारखा दुसरा जीव निर्माण करणे याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. आंब्याचे झाड त्याची बी रुजवल्याने तयार होते. तसंच काही झाडांना नवी पालवी फुटते तर काहींच्या खोडापासून नवीन रोप तयार होते. याचाच अर्थ वनस्पतींचे प्रजनन हे त्यांच्या बियांपासून , खोडापासून किंवा पानांपासून होते.