सजीव सृष्टी

श्वसन , उत्सर्जन

views

4:49
श्वसन करणे हेही सजीवांचे एक लक्षण आहे. सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. हवेतील ऑक्सिजन श्वासावाटे शरीरात घेणे आणि उच्छ्वासावाटे शरीरातील कार्बनडायओक्साईड बाहेर सोडणे यालाच श्वसन असे म्हणतात. सजीव जसे श्वसन करतात तसे उत्सर्जनही करतात. जसे वगवेगळ्या प्राण्यांमध्ये श्वसनासाठी वेगवेगळे अवयव असतात तसेच ‘उत्सर्जनासाठीही’ विविध अवयव असतात. मलमूत्र हे उत्सर्ग आहेत.ज्याप्रमाणे वाढ, श्वसन ही सजीवांची लक्षणे आहेत त्याच प्रमाणे उत्सर्जन हेही सजीवांचेच लक्षण आहे.