सजीव सृष्टी

ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना

views

4:7
सजीवांमध्ये जन्म, वाढ, प्रजनन, मृत्यू हे टप्पे दिसतात. जन्मापासून सुरु झालेल्या जीवनक्रिया हळू-हळू थांबतात आणि त्यांचा मृत्यू होतो. प्राणी आणि वनस्पती यांच्या आयुष्याची मर्यादा वेगवेगळी आहे. कोणताही जीव हा आपल्यासारखा दुसरा जीव मरेपर्यंत जन्माला घालत नसतो. तर त्याचे काही मर्यादित वय असते. सहसा म्हातारी आजी बाळाला जन्म देत नाही पण तरुण महिला बाळाला जन्म देते. कारण वयाच्या एका ठराविक टप्यानंतर सजीवांचे शरीर क्षीण होते आणि ते प्रजनन करण्यास समर्थ राहत नाहीत. आणि काही काळाने त्यांचे आयुष्य संपते आणि ते मरण पावतात. सर्व सजीवांचे शरीर हे अनेक लहान लहान पेशींपासून बनलेले असते. एखादी इमारत जशी विटांपासून बनलेली असते त्याप्रमाणे सजीवांचे शरीर सूक्ष्म पेशींनी बनलेले असते. प्रत्येक सजीवाच्या शरीरातील आकारानुसार शरीरातील पेशींची संख्या कमी - जास्त असते. हात, पाय, नाक, कान, डोळा हे पाठीचा कणा असणाऱ्या सजीवांचे अवयव आहेत. या अवयवांमार्फत प्राण्यांमध्ये विविध क्रिया घडून येतात. बाहेरील अवयवांशियाय पचनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था अशा इंद्रिय संस्थामार्फत प्राण्यांमध्ये शरीराच्या आतील भागात विविध कार्य चालू असते. ते सर्व कार्य पेशींच्या मदतीनेच केले जाते.