अपूर्णांक

सममूल्य अपूर्णांक तयार करणे

views

3:40
सममूल्य अपूर्णांक तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले की ; सममूल्य अपूर्णांक कसा शोधायचा. आता आपण सममूल्य अपूर्णांक तयार कसा करायचा याचा अभ्यास करू. सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी अपुर्णकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणावे किंवा भागावे लागते. हे समजून घेण्यासाठी आपण वरील उदाहरणांचा वापर करू. १) 1/2 = 1/2 × 2/2 = 2/4 (एक छेद 2 हा मूळ अपूर्णांक आहे त्याला आपण 2 ने गुणले असता 2/4 अपूर्णांक मिळतो. २) 1/2 = 1/2 × 3/3 = 3/6 (1/2 या मूळ अपूर्णांकास 3 ने गुणले असता 3/6 हा अपूर्णांक मिळतो ३) 4/8 = 4÷4 / 8÷4 = 1/2 (4/8 या अपूर्णांकास 4 ने भागले असता आपणास मूळ अपूर्णांक म्हणजेच 1/2 मिळतो.) आता ३/५ या अपूर्णांकाशी सममूल्य असणारे तीन अपूर्णांक शोधू . १) 3/5 × 2/2 = 6/10 (3/5 या अपूर्णांकास 2 या अंकाने गुणले असता 6/10 हा अपूर्णांक मिळतो.) २) 3/5 × 3/3 = 9/15 (3/5 या अपूर्णांकास 3 या अंकाने गुणले असता 9/15 हा अपूर्णांक मिळतो.) ३) 3/5 × 4/4 = 12/20 (3/5 या अपूर्णांकास ४ या अंकाने गुणले असता 12/20 हा अपूर्णांक मिळतो.) यावरून 3/5 या अपूर्णांकाचे 6/10 ,9/15 , 12/20 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. आपण पाहिले की गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक काढता येतो. त्याचप्रमाणे भागाकार करूनही आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढता येतो.