अपूर्णांक

उदाहरणे सोडवू

views

3:34
आता ३/५ या अपूर्णांकाशी सममूल्य असणारे तीन अपूर्णांक शोधू . १) 3/5 × 2/2 = 6/10 (3/5 या अपूर्णांकास 2 या अंकाने गुणले असता 6/10 हा अपूर्णांक मिळतो.) २) 3/5 × 3/3 = 9/15 (3/5 या अपूर्णांकास 3 या अंकाने गुणले असता 9/15 हा अपूर्णांक मिळतो.) ३) 3/5 × 4/4 = 12/20 (3/5 या अपूर्णांकास ४ या अंकाने गुणले असता 12/20 हा अपूर्णांक मिळतो.) यावरून 3/5 या अपूर्णांकाचे 6/10 ,9/15 , 12/20 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. आपण पाहिले की गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक काढता येतो. त्याचप्रमाणे भागाकार करूनही आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढता येतो. त्याचेही उदाहरण पाहू. उदाहरण : 6/12 या अपूर्णांकाला एकाच संख्येने भागून सममूल्य अपूर्णांक तयार करता येतो. 6/12 ÷ 2/2 = 3/6 (6/12 या अपूर्णांकास 2 ने भागले असता 3/6 हा अपूर्णांक मिळतो.) तसेच 6/12 ÷ 3/3= 2/4 (6/12 या अपूर्णांकास 3 ने भागले असता 2/4 हा अपूर्णांक मिळतो.) शिवाय 6/12 ÷ 6/6 = 1/2 (6/12 या अपूर्णांकास 6 ने भागले असता 1/2 हा अपूर्णांक मिळतो.) यावरून 6/12 या अपूर्णांकाचे 3/6, 2/4 व 1/2 हे सममूल्य अपूर्णांक आहेत.