अपूर्णांक

समच्छेद अपूर्णांकांची बेरीज

views

4:46
समच्छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी समच्छेद अपूर्णांकांची बेरीज : करताना फक्त अंशाची बेरीज केली जाते. छेद आहे तसाच लिहिला जातो. यासाठी आपण काही आकृतीसह उदाहरणे पाहू. १) एका पट्टीचे आपण 9 समान भाग करू. यातील 2 भाग निळ्या रंगाने व 5 भाग हिरव्या रंगाने रंगवू. आणि एकूण रंगवलेला भाग किती अपूर्णांक आहे ते पाहू. तर 2/9 + 5/9 = ५+२ /९ = 7/9 म्हणून 7/9 हा एकूण रंगवलेला भागाचा अपूर्णांक आहे. २) एका आईसक्रीमचे आपण एकूण 6 भाग केले. त्यातील 1 भाग रोहनला व 3 भाग शामला दिले. तर एकूण किती भाग अपूर्णांक आपण आईस्क्रीम वाटले? तर 1/6 + 3/6 = 1+3 /6 = 4/6 म्हणून 4/6 भाग अपूर्णांक आईस्क्रीम वाटला. पण जर का अपूर्णांकाची बेरीज ही छेदाइतकी झाली तर त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते. उदा 3/10 + 7/10 = 3+7/10 = 10/10 = 1 असेल. म्हणजेच कोणत्याही एका संख्येचा जर अंश आणि छेद समान असेल तर त्याची किंमत १ असेल. 5/5 = 1, 13/13 = 1, 8/8 = 1. इत्यादी.