अपूर्णांक

भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी

views

4:31
भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज करताना तिरकस गुणकार करावा. म्हणजेच अगोदर भिन्न छेद अपूर्णांकाचा छेद समान करावा आणि मग बेरीज किंवा वजाबाकी करावी. याकरिता आपण एक उदाहरण सोडवू, 2/3 + 1/6 =? प्रथम आपण एका आयाताचे 3 भाग करू. त्यातील 2 भाग रंगवू. आता 2/3 या अपूर्णांकात 1/6 मिळवायचा आहे. याच पट्टीच्या प्रत्येक भागाचे 2 समान भाग करू.आता यामध्ये 1/6 मिळवण्यासाठी 1 भाग रंगवू. आपल्याला दिसत आहे. एकूण रंगवलेला भाग हा 5/6 आहे. म्हणून 2/3 + 1/6 = 5/6.