वनस्पती: रचना व कार्य

आगंतुक मुळे आणि रुपांतरित मुळे

views

5:7
उसाच्या कांड्यावर तुम्हाला बारीक बारीक काड्या दिसतील. त्या वाळलेल्या बारीक काडयांनाच आगंतुक मुळे असे म्हणतात. उसाप्रमाणेच मका, ज्वारी यांनाही आगंतुक मुळे असतात. म्हणजेच उस, ज्वारी , मका यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी आंगतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात. मुळांना जमिनीतील माती घटट धरून ठेवणे, तसेच जमिनीतील पाणी, खनिजे आणि क्षार शोषून घेणे, वनस्पतींना आधार देणे अशी वेगवेगळी कार्ये करावी लागतात. आणि ही कार्ये करीत असताना वनस्पतींच्या मुळांमध्ये सतत बदल होत असतो. त्यांच्यात झालेल्या या बदलामुळेच त्यांना रुपांतरित मुळे म्हणतात. रुपांतरित मुळांमध्ये विशेष करून असतात: हवाई मूळे ती वातावरणातील बाष्प शोषून घेतात. आधार मुळे: ती जमिनीबाहेर झाडांना आधार देतात.