वनस्पती: रचना व कार्य

पानांच्या प्रकारांची माहिती

views

2:43
1. एकांतरित प्रकार : यामध्ये खोडावरील पानांची मांडणी खोडाच्या दोन्ही बाजूंना एक आड एक अशी असते. उदा. जास्वंदाची पाने. 2. आवर्ती प्रकार : यामध्ये खोडावरील पानांची मांडणी फिरती असते. म्हणजे दोन पाने पूर्व-पश्चिम अशी असली तर पुढची दोन पाने उत्तर दक्षिण अशी जोडी जोडीनेच असतात. 3. संमुख प्रकार : यामध्ये खोडाच्या दोन्ही बाजूला समोरासमोर पाने असतात. उदा.प्राजक्त. 4. वर्तुळाकार प्रकार : यामध्ये खोडावर पानांची मांडणी वर्तुळाकार असते. उदा.पांढरा चाफा. तसेच पर्णपत्राचे आकारानुसार सुद्धा प्रकार असतात. गोलाकार :म्हणजे गोल पाने असलेले. हस्ताकार : म्हणजे हातासारखा आकार असणारी पाने. तरफदार : म्हणजे जड वस्तू, वर उचलण्यासाठी तरफ वापरतात. त्याप्रमाणे पानाचा आकार असतो ती पाने. लंबाकार : म्हणजे लांब आकाराची पाने आढळतात.