वनस्पती: रचना व कार्य

फळ

views

3:50
फळ विषयी अधिक माहिती जाणून घेवू. आपण पपई, आंबा, केळी, फणस, द्राक्षे, अननस अशी अनेक फळे खातो. प्रत्येक फळाचा आकार, रंग, चव, बी यांमध्ये विविधता आढळून येते. बोर या फळात एकच बी असते. त्याचे बाहेरील आवरण कडक असते पण पिकल्यानंतर ते नरम पडते. तसेच आंब्याचे फळ सुध्या सुरुवातीला कडक असते पण पिकल्यानंतर नरम होते. आंबा पिकल्यानंतर त्याच्या बी चे रुपांतर बाट्यामध्ये होते. चिकूमध्ये एकापेक्षा जास्त बिया असतात. आणि चिकूचे बाह्य कवच खूप पातळ असते. तसेच सफरचंदा मध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त बिया असतात. काजू सारख्या फळामध्ये बी फळाच्या बाहेरच्या बाजूस आलेले असते. आणि त्याचे कवच नरम असते. अशाप्रकारे विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या बिया आपल्याला आढळतात.