वनस्पती: रचना व कार्य

खोड, पान

views

4:40
खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. जमिनीत बिया टाकल्यावर काही दिवसांनी जमिनीतून त्या बियांना अंकुर फुटतात. आणि या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वरच्या दिशेने होते. अंकुर जसाजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावरच्या ज्या ठिकाणाहून पाने फुटतात, त्याला पेरे(Node) म्हणतात. दोन पेरांतील अंतराला कांडे(Internode) म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला म्हणजेच सर्वात वरच्या भागाला मुकुल(Bud) म्हणतात.