वनस्पती: रचना व कार्य

फूल

views

3:6
फुला विषयी अधिक माहिती जाणून घेवू. देठ : फुलाला लांब किवा आखूड देठ (pedicel) असतो. याच्या देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. पुष्पाधार(receptacle) : जास्वंदीचे फूल देठावर ज्या ठिकाणी येते, तो भाग सामान्यत: पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावरच रचलेले असतात. निद्लपुंज (Calyx):- या फुलाच्या कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजेच निदलपुंज होय. द्लपुंज(Corolla) : द्लपुंज रंगीत किंवा पांढऱ्या पाकळ्यांनी बनलेला असतो. दलपुंज कीटकांना आकर्षित करण्याचे कार्य करतो. जसे गुलाब, मोगरा, शेवंती, यांसारख्या फुलांचे द्लपुंज. पुमंग (Androecium):हा फुलातील नर घटक असतो. फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसरांचा बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात. जायांग (Gynoecium): हा फुलातील स्त्रीघटक असतो. तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो. त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते.