सजीवांतील पोषण

वनस्पतीतील वहनव्यवस्था

views

3:14
वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या अशा दोन वहनव्यवस्था असतात. यामध्ये मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवण्याचे कार्य जलवाहिन्या करतात. वनस्पतीच्या पानांमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार केले जाते. हे तयार झालेले अन्न म्हणजेच शर्करा व अन्यघटक वनस्पतीच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी किंवा साठवण करण्यासाठी वाहून नेण्याचे कार्य रसवाहिन्या करतात. अशा प्रकारची वहनव्यवस्था वनस्पतीमध्ये असली तरी त्यांच्यामध्ये स्वतंत्र पचनसंस्था किंवा उत्सर्जन संस्था नसते.