सजीवांतील पोषण

प्राण्यांमधील पोषण

views

3:59
शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीरातील सर्व भागांना पुरविले जातात. आपण खात असलेले अन्न जसेच्या तसे आपल्या रक्तात मिसळत नाही. खाल्लेल्या अन्नातून पचनक्रियेद्वारे विद्राव्य घटक तयार होतात आणि मगच ते रक्तात मिसळतात. शरीराला असणारी पोषकतत्त्वांची गरज, अन्नग्रहणाची पद्धत आणि त्यांचा शरीरात होणारा वापर या तीन गोष्टी प्राण्यांमधील पोषणाशी संबंधित असतात. प्राण्यांमधील पोषण हे अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण आणि उत्सर्जन या पाच टप्प्यांद्वारे होते.