सजीवांतील पोषण

कीटकभक्षी वनस्पती

views

4:24
काही वनस्पती किटकांचे भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्नघटक मिळवतात. अशा वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. या वनस्पती नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. उदा. ड्रॉसेरा बर्मानी, घटपर्णी इत्यादी. ड्रॉसेरा बर्मानी या वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी दिसते. ते जमिनीला लागून वाढते. तिची पाने आकर्षक, गुलाबी, लाल रंगाची असतात आणि त्यांच्या कडांना बारीक केसतंतू असून त्यांवर कीटकांना आकर्षणारे चिकट असे द्रवाचे बिंदू असतात. इ.स. 1737 मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला त्यामुळे या वनस्पतीचे नाव ड्रॉसेरा बर्मानी असे आहे. खरंतर घटपर्णी या वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषणाची क्रिया होत असते. तरीही आपण या वनस्पतीला कीटकभक्षी वनस्पती म्हणतो. कारण घटपर्णी वनस्पती ज्या मातीत वाढते तेथे नायट्रोजनची कमतरता असते. त्यामुळे वाढीसाठी आणि प्रथिने निर्मितीसाठी लागणारे पुरेसे नायट्रोजन मातीतून न मिळाल्याने घटपर्णी वनस्पतीला कीटकभक्षण करावे लागते.