सजीवांतील पोषण

नायट्रोजनचे स्थिरीकरण

views

5:1
मुलांनो, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात. कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांपासून तयार होतात. तर प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजनपासून बनतात. हवेमध्ये नायट्रोजन हा वायुरूपात असतो. परंतु वनस्पती वायुरूपामधील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांचे संयुगात रूपांतर केले जाते. यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण दोन प्रकारांनी होते. जैविक स्थिरीकरण आणि वातावरणीय स्थिरीकरण.