सजीवांतील पोषण

अन्नप्रकारांनुसार सजीवांचे वर्गीकरण

views

5:27
प्राण्यांचे वर्गीकरण त्यांच्या अन्नप्रकारांनुसार शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी प्राणी, स्वच्छता कर्मी, आणि विघटक या प्रकारांत होते. शाकाहारी प्राणी: शाकाहारी प्राणी म्हणजे असे प्राणी जे अन्न म्हणून वनस्पती, गवत, बिया, फळे यांचा उपयोग करतात. उदा. गाय गवताचा अन्न म्हणून उपयोग करते. तर शेळी पाला खाते. उंट झाडाची पाने खातो. माकड, फळे, पाने, फुले खाते. मांसाहारी प्राणी : काही प्राणी हे अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात. जे प्राणी इतर प्राण्यांचे मांस अन्न म्हणून ग्रहण करतात, त्यांनाच मांसाहारी प्राणी म्हणतात. उदा. वाघ, सिंह, हे जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करून आपले अन्न मिळवतात. तर बेडकासारखे मांसाहारी प्राणी कीटकांना मारून आपले अन्न मिळवतात. मिश्राहारी प्राणी : जे प्राणी अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी या दोहोंवर अवलंबून असतात, त्यांना मिश्राहारी प्राणी म्हणतात. जसे वानर, चिंपांझी, मानव इत्यादी प्राणी. अस्वलदेखील मध, फुले-फळे खाते, आणि वाळवी सारखे किडेही खाते. स्वच्छताकर्मी : आपल्या सभोवताली असे प्राणीही असतात, जे स्वत:च्या अन्नग्रहणासोबत पर्यावरण स्वच्छतेचे कामही करतात. म्हणून त्यांना स्वच्छताकर्मी प्राणी म्हणतात. असे प्राणी मृत प्राण्यांच्या शरीरापासून मिळणाऱ्या मांसाचा अन्न म्हणून उपयोग करतात. उदा. तरस, गिधाड, कावळे वगैरे प्राणी. विघटक : काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराचे अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात, अशा प्राण्यांना विघटक असे म्हणतात. मृत प्राण्याचे शरीर जमिनीत कुजल्यानंतर त्यावर जमिनीतील सूक्ष्मजीव जगत असतात. त्यामुळे या अशा नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून सूक्ष्मजीवांचे पोषण होते.