शिवपूर्वकालीन महाराष्ट्र Go Back गाव (मौजा) views 3:50 मौजा म्हणजे गाव. बरेच लोक मौजामध्ये म्हणजे गावामध्ये राहत असत. गावचा प्रमुख पाटील असे. म्हणजे पाटलाच्या देखरेखीखाली गावाचा कारभार चालत असे. गावातील लोकांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी, म्हणजे पडीक जमिनींची मशागत करून त्या जमिनीत पीक घ्यावे म्हणून पाटील प्रयत्न करीत असत. त्याचप्रमाणे गावात भांडणे, वाद झाले तर ते मिटविण्याचे व गावात शांतता निर्माण करण्याचे काम पाटीलच करीत असे. पाटलांना मदत करण्यासाठी कुलकर्णी असत. कुलकर्णी गावातून जमा झालेल्या महसुलाची नोंद ठेवत असे. महसूल म्हणजे कर होय. म्हणजेच आजच्या खेडेगावात जसे सरपंच गावाचा कारभार करतात, तर तलाठी महसूल गोळा करतात तसेच पूर्वीही होते. मौजामध्ये निरनिराळी कामे करणारे कारागीर असत. हे कारागीर त्यांच्या वंशपरंपरेने चालत आलेले व्यवसाय करत. उदा. १) कुंभाराचा मुलगा हा त्याच्या वडिलांसारखा मडकी किंवा मातीच्या वस्तू बनवत असे. २) न्हाव्याचा मुलगा त्याच्या वडिलांसारखे इतरांचे केस कापण्याचे काम करीत असे. हे कारागीर गावातील शेतकऱ्यांना सेवा देत असत. त्या बदल्यात शेतकरी त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा देत असत. त्याला बलुतं असे म्हणत. गावात १२ – बलुते असत. प्रस्तावना गाव (मौजा) परगणा वारकरी पंथाचे कार्य संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम रामदास स्वामी संतकार्याची फलश्रुती