शिवपूर्वकालीन महाराष्ट्र Go Back वारकरी पंथाचे कार्य views 3:26 वारकरी पंथाचे कार्य : शिवपूर्वकाळात अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त प्रभाव होता. कर्मकांड म्हणजे पूजाअर्चा, व्रतकैवल्ये इत्यादी. लोकं दैववादाच्या आहारी गेले होते. लोकांची मानसिक परिस्थिती फारच खचलेली होती. संपूर्ण नैराश्यमय वातावरण तयार झाले होते. त्यात चैतन्य निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. वारकरीपंथ यातील 'वारकरी' शब्दाचा अर्थ काय? तर जो वारी करतो तो वारकरी. म्हणजे पंढरपुरातील मुख्य दैवत श्रीपांडुरंगाच्या दर्शनला दर वर्षी नियमानें जाणारा असा आहे. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून संत परंपरा सुरू झाली. ती समाजातील विविध स्तरांतून आलेल्या संतानी सुरु ठेवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व व्यवसाय, धर्म, पंथ, वंशातील लोक होते. उदा. संत गोरोबा हे कुंभार होते, तर संत सावता हे माळी होते. संत नरहरी हे सोनार होते. संत सेना न्हावी होते. संत तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी होते. संत नामदेव शिंपी होते. संत एकनाथ हे वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण होते. त्याचप्रमाणे सतांमध्ये स्त्रियाही होत्या. त्यात संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहिण संत निर्मळाबाई या होत्या. तसेच संत मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या स्त्रिया होत्या. या संतांचे आश्रयस्थान पंढरपूर होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. प्रस्तावना गाव (मौजा) परगणा वारकरी पंथाचे कार्य संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम रामदास स्वामी संतकार्याची फलश्रुती