शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

रामदास स्वामी

views

02:09
रामदास स्वामी :-रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानशा गावी झाला. त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर होते. लोक त्यांना समर्थ रामदास म्हणत. यांनी बलोपासनाचे महत्त्व सांगितले. ‘मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा |’हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. म्हणजेच मराठा लोकांनी किंवा महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र येऊन आपल्या धर्माची वाढ करावी असे त्यांनी सांगितले. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. म्हणजेच, दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे ज्ञान दिले. लोकांनी एकत्र येऊन संघटन करून एकीने राहण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. अशा तऱ्हेने त्यांनी आपल्या विचारांनुसार लोकांच्यात जागरूकता निर्माण केली. त्यांनी समर्थ संप्रदाय तयार केला. सातारा जिल्ह्यातील ‘चाफळ’ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामदासांनी रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आणि अनेक ठिकाणी रामाची व हनुमानाची मंदिरे बांधली. चाफळ या ठिकाणी असेच एक रामाचे मंदिर आहे. त्यांनी ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ ही महाराष्ट्रातील घराघरात म्हटली जाणारी गणपतीची आरती लिहिली. रामदासांनी आपले विचार पसरविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर प्रवास केला. त्यांनी शिवाजी महराजांच्या आज्ञेनुसार सज्जन गडावर वास्तव्य केले. त्यांचे निधन १६८१ ला सज्जनगडावर झाले