स्थितीक विद्युत

विद्यतप्रभाराचा उगम कसा होतो?

views

3:03
सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असतात. आणि या कणांचा सर्वात लहानांत लहान कण म्हणजेच अणु असतो. हे आपल्याला माहीत आहेच. प्रत्येक अणूमध्ये स्थिर असणारा धनप्रभारित भाग आणि चल असणारा ऋण प्रभारित भाग असतो. प्रत्येक अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण त्यातील धन व ऋण प्रभारांचे प्रमाण समान असते. जेव्हा विद्युत दृष्ट्या उदासीन असलेल्या एखाद्या वस्तूतील ऋण प्रभार काही कारणाने कमी होतो तेव्हा त्या वस्तूतील अणु धनप्रभारित होतो. म्हणजेच काही विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरील चल ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले तेथे जास्त ऋणकण होतात. त्यामुळे त्या वस्तूतील धनप्रभार कमी होऊन ऋणप्रभार वाढतो. आणि त्यामुळे ती वस्तू ऋणप्रभारित होते. याउलट ज्या वस्तूमधून हे ऋणप्रभार गेलेले असतात त्या वस्तूमध्ये ऋणप्रभारांचे प्रमाण कमी होते. आणि त्या ठिकाणी धनप्रभारांचे प्रमाण वाढून ती वस्तू धनप्रभारित होते. म्हणजेच घासल्या गेल्याने या दोन वस्तूंपैकी एक वस्तू धनप्रभारित होते, तर दुसरी वस्तू ऋणप्रभारित. आणि अशाप्रकारे या वस्तू विद्युत प्रभारित बनतात.