स्थितीक विद्युत

घर्षण विद्युत

views

3:14
घर्षणाने वस्तू प्रभारित करता येते हे विविध प्रयोगाने आपण पाहिले आहेच. त्याप्रमाणे दोन दगड एकमेकांना घासले की त्यांचे एकमेकांशी घर्षण होऊन आगीची ठिणगी पेटते. किंवा जंगलामध्ये झाडांच्या घर्षणाने वणवा पेटून जंगलामध्ये आग लागते. तर अशाप्रकारे घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युतप्रभाराला घर्षणविद्युत म्हणतात. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. त्यामुळे अशा विद्युतप्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात. वस्तूंवर ते थोडया वेळेपर्यंत राहतात. स्थितिक विद्युतमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. म्हणून हिवाळ्यात कोरडया हवेत हे प्रयोग केले तर आपल्याला परिणाम पाहायला मिळतात.तुम्ही तुमच्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर जोरजोरात घासा, घर्षणामुळे हाताचे तळवे हलकेसे गरम झालेले जाणवतात. स्ट्रॉमधील बदल :काही स्ट्रॉ घेतल्या आहेत आणि लोकरी कापड आणि काचेची बाटली. आता या काचेच्या बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवली. आणि दुसरी स्ट्रॉ या बाटलीवरील स्ट्रॉ जवळ नेली. पहा काय झाले? दोन्ही स्ट्रॉ मध्ये काहीही झाले नाही. ना प्रतिकर्षण ना आकर्षण. कारण यातील कोणतीही स्ट्रॉ विद्युत प्रभारित नाही.विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. तसेच समान विद्युतप्रभारांमध्ये प्रतिकर्षण होते. तर विरुद्ध विद्युतप्रभारांमध्ये आकर्षण होते.विद्युत प्रतिकर्षण मात्र केवळ दोन समान (सजातीय) विद्युतप्रभारित वस्तूंमध्येच होते. म्हणून विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण हीच कसोटी वापरतात.