स्थितीक विद्युत

विद्युत प्रभार निर्मिती

views

3:19
विद्युत प्रभार निर्मितीविषयी जाणून घेवूयात. विदयुत प्रभार निर्मिती कशी होते हे एका प्रयोगावरून समजून घेऊ एक कंगवा घेऊन तो जोरात केसावर घासला नंतर तो पाण्याच्या धारेजवळ घेऊन गेला असता पाण्याची धार कंगव्या कडे आकर्षित झाली. हा कंगवा पाण्यापासून दूर नेला असता पाण्याची धार आकर्षित होत नाही कारण सुरवातीस पाण्याची धार प्रभाररहित आहे. आणि कंगवा ऋणप्रभारित आहे. असा हा ऋणप्रभारित कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच पाण्याच्या धारेतील कंगव्यासमोरच्या भागातील ऋण कण दूर सारले जातात. अशावेळी ऋणप्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धनप्रभारित बनतो. म्हणजे त्यावेळी कंगवा ऋणप्रभारित असतो आणि पाण्याची धार धनप्रभारित असतो. त्यामुळे या दोन विजातीय आकर्षणामुळे पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षिली जाते.याउलट जेव्हा कंगवा दूर नेला तेव्हा पाण्यातील ऋण कण पुन्हा पूर्वस्थानी येतात. त्यामुळे धन आणि ऋण प्रभारांची संख्या समान होते. त्यामुळे पाण्याची धार प्रभाररहित होते. आणि आकर्षित होणे थांबते.म्हणजे यावरून आपल्याला असे समजते की, प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋणप्रभारांची संख्या सारखी असते. आणि प्रवर्तनाने म्हणजे जवळ गेल्याने निर्माण झालेला विद्युतप्रभार फक्त विद्युतप्रभारित वस्तू जवळ असेपर्यंतच टिकतो.