स्थितीक विद्युत

प्रयोग

views

2:55
घर्षणाने कोणत्या वस्तू प्रभारित होतात आणि कोणत्या होत नाहीत हे समजण्यासाठी प्रयोग पाहूया.घर्षणाने कोणत्या वस्तू प्रभारित होतात आणि कोणत्या होत नाहीत ते आपल्याला पाहायचे आहे. माझ्याकडे एक लोकरी कापड आहे. आणि या ठिकाणी फुगा, रिफिल, खोडरबर, लाकडी स्केल, स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी या सर्व वस्तू आहेत. आणि हे इथे कागदाचे तुकडे आहेत. प्रथम मी एक –एक वस्तू रेशमी कापडाला न घासता या कागदांच्या तुकड्याकडे नेते. फुगा, रिफिल, खोडरबर, लाकडी स्केल, स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी. पाहा यातील कोणत्या वस्तूकडे कागदाचे तुकडे आकर्षिले गेले ? एकाही वस्तूकडे कागदाचे कपटे आकर्षित झाले नाहीत. याच वस्तू एक एक करून रेशीम कापडावर घासणार आहे. आणि मग या कागदाच्या तुकड्यांकडे नेणार आहे. तुम्ही नीट निरीक्षण करा आणि सांगा, काय होते आहे ते. हा फुगा मी रेशीम कापडावर घासून कागदांकडे नेलाकागदाचे तुकडे आकर्षिले गेले.