स्थितीक विद्युत

वातावरणातील विद्युतप्रभार

views

3:48
विजा पडल्याने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होते. उदा. वीज पडल्याने झाडे जळून जातात, इमारतींचे नुकसान होते, लोकांचा व जनावरांचा मृत्यू होतो, काही वेळा घरातील विद्युत उपकरणे निकामी होतात. अशा वेळी विजेच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आपण आपल्या संरक्षणासाठी काही उपाय केले पाहिजेत. विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये. पाण्यात उतरू नये, उंच ठिकाणी जाऊ नये, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती आपल्याजवळ नेहमी ठेवावी. तसेच ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे, झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे, जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच राहावे.विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता व प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यात रासायनिक क्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साइड वायू तयार होतो. हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर येतो व जमिनीची सुपीकता वाढवणारे ‘नत्र’ पुरवतो.तसेच विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रुपांतर होते. हा ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो.