स्थितीक विद्युत

विद्युतप्रभाराचे परिणाम

views

3:59
विद्युतप्रभाराचे परिणाम नेमके काय आहेत ते प्रयोगाद्वारे समजून घेवू. सुवर्णपत्र विद्युतदर्शी : हे वस्तूवरील विद्युतप्रभार ओळखण्याचे साधे साधन आहे. या विद्युतदर्शीमध्ये एका योग्य आकाराच्या बूचामध्ये पितळेची किंवा अॅल्युमिनिअमची दांडी घट्ट बसवलेली असते. या दांडीच्या एका टोकाला धातूची चकती असते, तर दुसऱ्या टोकाला सोन्याच्या पातळ पत्र्यांची दोन पाने बसवलेली असतात. पातळ पत्र्यांची पाने बाटलीत राहतील अशा बेताने बाटलीच्या तोंडावर बूच घट्ट बसवलेले असते. धातूची चकती बाटली बाहेर राहते. विद्युतदर्शीला बसवलेले बूच विद्युतरोधक असते. प्रभार नसणारी वस्तू जर या चकतीजवळ नेली, तर पाने मिटलेलीच राहतात. पण जर एखादी प्रभारित वस्तू चकतीजवळ नेली तर दोन्ही पाने सजातीय विद्युतप्रभारामुळे प्रतिकर्षित होतात. म्हणजेच एकमेकांपासून दूर जातात. पुन्हा जर चकतीला हाताने स्पर्श केला तर पाने पुन्हा जवळ येतात. कारण पानांमाधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो आणि पाने प्रभाररहित होतात.बेंजामिन फ्रँकलिन हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी असे बहुआयामी व्यक्ती होते. सन १७५२ मध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी त्यांचा मुलगा विल्यम याच्या सोबत पतंग उडवण्याचा प्रयोग केला. हा पतंग रेशमी कापड, देवदार झाडाचे लाकूड व धातूची तार वापरून तयार केला होता. धातूची तार अशाप्रकारे जोडली होती की, तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला तर दुसरे टोक पतंगाच्या दोराशी जोडले होते. ज्या दिवशी पतंग उडवला त्या दिवशी आकाशात विजा चमकत होत्या. पतंगाची तार ढगांना स्पर्श करताच विद्युतप्रभार ढगांतून पतंगावर स्थानांतरित झाला. तेव्हा पतंगाची सैल दोर ताठलेली होती. हा विद्युतप्रभार दोरीतून जमिनी पर्यंत पोहोचला व जमिनीला दोरीचा स्पर्श होताच ठिणगी पडली. अशा प्रकारे वीज म्हणजे विद्युतप्रभाराचे रूप आहे हे त्यांनी स्पष्ट केले.